शनिवारी सकाळी कणकवलीतील प्रसिद्ध सर्जन डॉ. विद्याधर तायशेटे सरांशी फोनवर बोलणं झालं. सर म्हणाले उद्या एक कार्यक्रम आहे.त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना काहीतरी विशेष भेटवस्तू द्यायची आहे. तुझं स्टोन आर्ट माझ्या डोक्यात आहे. मला तुझ्याकडून त्यांचं ‘स्टोन आर्ट’ बनवून मिळेल का..? मी म्हणालो ,सर इतक्या कमी कालावधीत बनवणं कठीण आहे. तरी ही तुम्ही फोटो पाठवा.मी पाहतो जमतंय… Continue reading स्टोन आर्ट
Blog
गणपती
गणपतीला वर्षातून एकदा मी माझ्या मूळ गावी असतो.साधं घर,शेणाने सारवलेल्या जमिनी. ही साधी घरं, जमिनीवर राहायला शिकवतात.साधेपणा शिकवतात. कैक फाजील चोचले आपोआप विरघळतात.गणपतीत शेजारची छोटी मुलं,आमच्या घरातील छोटा असे सर्व मिळून शेजारच्या तीन चार घरांत दररोज आनंदाने आरती करतात.एक जण हार्मोनियम वाजवतो,एकजण झांज, एकजण मृदुंग वगैरे…ही मुलं कोणत्याही क्लास ला वगैरे जात नाहीत. जे काही… Continue reading गणपती
आजोळ चे घर
नुकताच गणपतीत आजोळी गेलो होतो.119वर्ष जुनं घर.मोडकळीस आलेलं.लहानपणी च्या असंख्य आठवणींनी भरलेलं.घराचे बाहेरून फोटो काढले.त्या खिडक्या,त्या भिंती.अजून ही बोलक्या.कैक पावसाळे झेललेल्या.खिडकीच्या त्या लोखंडी गजांना पकडुन कित्येकदा आतून बाहेर डोकावलय.. गंजलेल्या त्या लोखंडी गजांचा गंध कसा विसरू..? लहानपणी खिडकी बाहेरच्या रस्त्याने ये जा करणारी माणसं अजूनही आठवतात. खिडकीतली सकाळ, दुपार, रात्र आठवते. खिडकीतून पाहिलेलं रात्रीचं आभाळ… Continue reading आजोळ चे घर
हॉस्पिटलातली नोकरी
हॉस्पिटलातली नोकरी. जेव्हा कोराना नुकताच सुरू होऊन हळूहळू जोर धरू लागला होता. त्यादरम्यान शाळेचा पगार काही टक्के मिळत होता.बाहेरचे क्लासेस वगैरे सगळं ठप्प.शाळेच्या दुप्पट माझं क्लासेस च उत्पन्न होतं.ते सगळं ठप्प.एरवी महिन्यातला एक ही दिवस मी फ्री नसे. असं गेले कित्येक वर्ष चालू होतं.पण कोरोनाने माझा पद्धतशीर कार्यक्रम केला.काहीच पर्याय उरला नव्हता. पापी पेट का… Continue reading हॉस्पिटलातली नोकरी
काका गेले
काका गेले.(मनसे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर.) आज सकाळी भावाचा फोन आला.म्हणाला अरे राजन काका गेले.तेव्हा मी शाळेच्या मुख्य गेटपाशी शाळेत नव्याने येणाऱ्या मुलांचं हसतमुखाने स्वागत करत होतो.आणि हे ऐकलं.साला हे आयुष्य जोकर करत कधी कधी.थोडा बाजूला झालो आणि शांत राहिलो.राजन काका.आमच्या जवळचा माणूस. शिक्षण कमी होतं.परंतु अंगी असलेली नैसर्गिक हुशारी, मह्त्वाकांक्षी ,स्पष्टवक्तेपणा, स्वभावतः निडर, नेतृत्व… Continue reading काका गेले
Untitled
या