Uncategorized – suman's art and writings https://sumandabholkar.prasand.in Sat, 09 Oct 2021 11:12:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 198547387 स्टोन आर्ट https://sumandabholkar.prasand.in/2021/10/09/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8b%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9f/ https://sumandabholkar.prasand.in/2021/10/09/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8b%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9f/#respond Sat, 09 Oct 2021 10:02:53 +0000 https://sumandabholkar.prasand.in/?p=72 Continue reading स्टोन आर्ट]]>

शनिवारी सकाळी कणकवलीतील प्रसिद्ध सर्जन डॉ. विद्याधर तायशेटे सरांशी फोनवर बोलणं झालं. सर म्हणाले उद्या एक कार्यक्रम आहे.त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना काहीतरी विशेष भेटवस्तू द्यायची आहे. तुझं स्टोन आर्ट माझ्या डोक्यात आहे. मला तुझ्याकडून त्यांचं ‘स्टोन आर्ट’ बनवून मिळेल का..? मी म्हणालो ,सर इतक्या कमी कालावधीत बनवणं कठीण आहे. तरी ही तुम्ही फोटो पाठवा.मी पाहतो जमतंय का..त्यावर सर म्हणाले, बरं, एक काम कर मला भेटायला हॉस्पिटलमध्ये ये निवांत बोलू.
दरम्यान सरांनी फोटो पाठवला होता.तो पाहून दगड शोधायला गेलो.त्यात बराच वेळ गेला.हताश होऊन घरी आलो.
संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये पोचलो.सरांनी माझ्या कलेचं कौतुक केलं शिवाय कलेबद्दल अगदी उत्सुकतेने जाणून देखील घेतलं.
मला म्हणाले, बघ जमतंय का हे स्टोन आर्ट करायला. ते माणूस माझ्यासाठी खूप विशेष आहेत रे. सरांच्या आवाजातील आर्जवता पाहून मीच खजिल झालो. त्यांना म्हटलं काम होईल सर. त्यावर सर हात मिळवून म्हणाले खूप धन्यवाद.
घरी पोचल्यावर नदीकिनारी तडक निघालो. तिन्हीसांजेची वेळ होती. म्हटलं दगड शोधूनच माघारी येईन. शेवटी एक दगड सापडला.
रात्रभर दगडावर काम केलं. पहाटे चार वाजता काम पूर्ण झालं. त्याचा फोटो सरांना व्हाट्सअप वर पाठवला. तसं त्यांना फोन करून सांगितलं.सर म्हणाले, ते आर्ट घेऊन ये हॉस्पिटलमध्ये.की माणूस पाठवू तुझ्या घरी..? मी म्हणालो, नको मीच येतो घेऊन. हॉस्पिटल मध्ये पोचलो.केबिन मध्ये जाऊन ते स्टोन आर्ट पिशवीतून बाहेर काढून सरांना दाखवणार इतक्यात सर खुर्ची वरून उठून उभे राहुन त्यांनी ते स्टोन आर्ट स्वीकारलं.खूप खुश झाले. माझं काम बघून. म्हणाले मोठं काम केलंस. ह्याचे मी तुला पैसे देणार.किती झाले ते सांग.मी किंमत सांगताक्षणी तात्काळ ती रक्कम त्यांनी माझ्या हातात सुपूर्द केली.
दुसऱ्या दिवशी त्या कार्यक्रमात मी केलेलं स्टोन आर्ट सर्वांसमक्ष अध्यक्षांना देण्यात आलं. ते आर्ट पाहून अध्यक्षांनी आश्चर्य चकित होऊन डोक्याला हात लावला. त्या कार्यक्रमात माझे वडील उपस्थित होते. अध्यक्ष वडिलांना भेटून म्हणाले मुलाला खूप धन्यवाद सांगा. अप्रतिम कला आहे त्याच्याकडे.
असा हा विलक्षण अनुभव.
आपली कला अशी अनेकांना आनंद देते ते पाहून खूप बरं वाटतं. अधिक काम करण्याची, मेहनत घेण्याची उर्मी वाढते.

सुमन दाभोलकर.

]]>
https://sumandabholkar.prasand.in/2021/10/09/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8b%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9f/feed/ 0 72
गणपती https://sumandabholkar.prasand.in/2021/10/09/%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80/ https://sumandabholkar.prasand.in/2021/10/09/%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80/#respond Sat, 09 Oct 2021 08:06:40 +0000 https://sumandabholkar.prasand.in/?p=61 Continue reading गणपती]]>

गणपतीला वर्षातून एकदा मी माझ्या मूळ गावी असतो.
साधं घर,शेणाने सारवलेल्या जमिनी. ही साधी घरं, जमिनीवर राहायला शिकवतात.साधेपणा शिकवतात. कैक फाजील चोचले आपोआप विरघळतात.
गणपतीत शेजारची छोटी मुलं,आमच्या घरातील छोटा असे सर्व मिळून शेजारच्या तीन चार घरांत दररोज आनंदाने आरती करतात.एक जण हार्मोनियम वाजवतो,एकजण झांज, एकजण मृदुंग वगैरे…
ही मुलं कोणत्याही क्लास ला वगैरे जात नाहीत. जे काही आहे ते सगळं उपजतच.माझ्यामते कला ही प्रतिकूल परिस्थितीतच सुखाने नांदत असावी.

मुलांना हा आनंद घेता यायला हवा.गणपतीच्या निमित्ताने ती तो घेतात.

सुमन दाभोलकर.

]]>
https://sumandabholkar.prasand.in/2021/10/09/%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80/feed/ 0 61
आजोळ चे घर https://sumandabholkar.prasand.in/2021/10/09/%e0%a4%86%e0%a4%9c%e0%a5%8b%e0%a4%b3-%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%98%e0%a4%b0/ https://sumandabholkar.prasand.in/2021/10/09/%e0%a4%86%e0%a4%9c%e0%a5%8b%e0%a4%b3-%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%98%e0%a4%b0/#respond Sat, 09 Oct 2021 08:05:04 +0000 https://sumandabholkar.prasand.in/?p=59 Continue reading आजोळ चे घर]]>

नुकताच गणपतीत आजोळी गेलो होतो.119वर्ष जुनं घर.मोडकळीस आलेलं.
लहानपणी च्या असंख्य आठवणींनी भरलेलं.
घराचे बाहेरून फोटो काढले.
त्या खिडक्या,त्या भिंती.अजून ही बोलक्या.कैक पावसाळे झेललेल्या.खिडकीच्या त्या लोखंडी गजांना पकडुन कित्येकदा आतून बाहेर डोकावलय.. गंजलेल्या त्या लोखंडी गजांचा गंध कसा विसरू..? लहानपणी खिडकी बाहेरच्या रस्त्याने ये जा करणारी माणसं अजूनही आठवतात. खिडकीतली सकाळ, दुपार, रात्र आठवते. खिडकीतून पाहिलेलं रात्रीचं आभाळ आठवतय. चांदण्या,चंद्र आठवतय.आजीचं ते खिडकीत बसणं आठवंतय. त्या खिडक्या पाहिल्या की वाटतं त्या सदोदित सताड डोळ्यांनी कुणाची तरी वाट पाहत आहेत.त्या कमालीच्या बोलक्या का आहेत..?
माडांच्या लाकडाचं घराचं ते छत अजूनही आधार देणारं का भासतंय..?त्या छताने कित्येकांना आधार दिलाय..सावली दिलीय..अजूनही वरून पाहतय सर्वांना. वडीलधाऱ्या स्वभावाने.”भिऊ नकोस मी तुमच्या वर आहे.”
त्या भिंतीवर क्रिकेट खेळलेल्या बोलांचे ठसे रुबाबात आहेत.नळ्या च्या खापरी ने अनेकदा कोरलं होतं. त्यातलं काही नाही दिसलं.बहुतेक विरून गेलं असावं.मात्र आठवणीं विरत नाहीत.त्या धुसमुसत असतात.बाहेर पडायला एखादी फट पाहत असतात.

सुमन दाभोलकर.

]]>
https://sumandabholkar.prasand.in/2021/10/09/%e0%a4%86%e0%a4%9c%e0%a5%8b%e0%a4%b3-%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%98%e0%a4%b0/feed/ 0 59
हॉस्पिटलातली नोकरी https://sumandabholkar.prasand.in/2021/10/09/%e0%a4%b9%e0%a5%89%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%9f%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%80/ https://sumandabholkar.prasand.in/2021/10/09/%e0%a4%b9%e0%a5%89%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%9f%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%80/#respond Sat, 09 Oct 2021 08:03:32 +0000 https://sumandabholkar.prasand.in/?p=57 Continue reading हॉस्पिटलातली नोकरी]]>

हॉस्पिटलातली नोकरी.

जेव्हा कोराना नुकताच सुरू होऊन हळूहळू जोर धरू लागला होता. त्यादरम्यान शाळेचा पगार काही टक्के मिळत होता.बाहेरचे क्लासेस वगैरे सगळं ठप्प.शाळेच्या दुप्पट माझं क्लासेस च उत्पन्न होतं.ते सगळं ठप्प.एरवी महिन्यातला एक ही दिवस मी फ्री नसे. असं गेले कित्येक वर्ष चालू होतं.पण कोरोनाने माझा पद्धतशीर कार्यक्रम केला.काहीच पर्याय उरला नव्हता. पापी पेट का सवाल था.मग ठरवलं. कुठेतरी पार्ट टाईम काम शोधावं.जे मिळेल ते करू. परिचितांना तसं विचारू लागलो.दरम्यान माझे एक जवळचे डॉ. होते. त्यांचं हॉस्पिटल होतं. एकदा सहज त्यांच्याशी बोलता बोलता त्यांना म्हणलो, सर माझ्यासाठी कुठे पार्ट टाईम जॉब असेल तर बघा. मी शोधात आहे. ते म्हणाले माझी आर्ट फिल्ड मध्ये फारशी ओळख नाही..तरी ही कुठे जॉब असेल तर कळवतो. त्यावर मी म्हटलं असं काही नाही सर, कोणत्याही स्वरूपाचा चालेल. अरे, मग माझ्या हॉस्पिटल मध्ये काम करशील ? चांगला पगार देईन.बघ रिसेप्शनिस्ट म्हणून काम करावं लागेल. चालेल तुला ? कोविड हॉस्पिटल आहे ..चालेल ? मी म्हटलं चालेल सर. कोविड हॉस्पिटल असल्याने मनात थोडी घालमेल होती.पण माझ्यासाठी ही कॅल्क्युलेटेड रिस्क होती.
हा जॉब न केल्यानं काही उपाशी रहाणार नव्हतो. पण मला आयुष्यात नेहमीच निरनिराळे अनुभव घ्यावेसे वाटत असतात.एकसुरी जीवन नको वाटतं.स्वतःला आर्ट क्षेत्रा शिवाय देखील इतर क्षेत्रांतलं ज्ञान असावं हा ही विचार त्या मागे होता. म्हटलं अनुभव तर घेऊन पहावा म्हणून ह्या कामात शिरलो.
संध्याकाळी 4.30 ते रात्री 12.30 अशी वेळ ठरली.कारण दुपार पर्यंत शाळेचं काम असे.
पहिल्या दिवशी कामावर हजर झालो.सोबत एक अनुभवी रिसेप्शनिस्ट होत्या. त्या मला काम समजावत होत्या.माझ्यासाठी सगळं वातावरण नवीन.गपगुमान काम करायचो. कितीही काही ही होवो चेहेऱ्यावर स्मित हास्य.डॉ. यायचे, त्यांच्याशी बोलणं, त्यांना काय हवं नको ते पाहणं. इत्यादी. नर्सेस चा स्टाफ होता.कोविड मुळे सतत धावपळ असे. अनेक रुग्ण त्यांचे नातेवाईक.बर ती सतत काळजी घेणं मास्क, डोळ्यावर चश्मा , ग्लोव्हज इत्यादी. पिपी ई किट घालत नसे मी. कारण काही वेळेस घालून पाहिलेलं पण त्या अवस्थेत इतके तास ते घालून राहणं माझ्याने झालं नसतं.म्हणून त्या डॉ. चं सोसंण कळत होतं.जे त्या अवस्थेत कितीतरी काळ असत. कधी कधी अपरात्री पेशंट येत असत. त्यामुळे कित्येक रात्री माझ्या हॉस्पिटल मध्ये गेल्यात.पहाटे चार पाच वाजता डॉ, नर्सेस बरोबर गप्पा मारत चहा पिणं ,मस्ती, मस्करी करणं ,अर्थात डॉ.माझी, नर्सेस मस्करी करत असे. मी हॉस्पिटल मध्ये कुणाला ही थांगपत्ता लागू दिला नव्हता की माझं मुख्य प्रोफेशन कोणतं.? मी काय करतो इत्यादी…त्यामुळे मला ते डॉ. त्याचप्रमाणे ट्रीट करत जस एखाद्या रिसेप्शन काऊंटर वर काम करणाऱ्या माणसाला केलं असतं. डॉ केबिन मधून बेल मारत मग त्याचा दरवाजा उघडुन स्मित हास्याने सर काही काम आहे का..? मग डॉ. अमका स्टॅम्प घेऊन ये,अमका पेपर घेऊन ये , पेन घेऊन ये , अमक्या पेशंट ची फाईल घेऊन ये ,पाणी , चहा आणायला सांग मावशींना अशी कैक कामं सांगत.हो सर असं अगदी प्रेमाने म्हणून सगळी कामं मी निमूट पणें करत असे .बऱ्याचदा पळत, पळत खाली ग्राउंड फ्लोअर वर जाऊन लिफ्ट पाशी चेअर वर बसलेले पेशंट वर हॉस्पिटल मध्ये घेऊन येणं, त्यांना वॉर्ड मध्ये शिफ्ट करणं, पळत पळत डॉ. ला बोलावून आणणं, पेशंट च्या नातेवाईकांना सांभाळणं,त्यांच्या कडून ऍडमिशन फॉर्म्स भरून घेणं ,ते नीट फाईल ला लावणं, ऍडव्हांस पैसे घेणं, तो हिशोब ठेवणं इत्यादी काम चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवून केली. तसेच ग्राउंड फ्लोअर वर असलेले ऑक्सिजन चे सिलेंडर वेळोवेळी बदलणं,त्यासाठीची हृदयाची ठोके वाढवणारी ती धावपळ हे सगळं केलं. त्यामुळे ऑक्सिजन हा किती महत्वाचा आहे त्याची प्रचंड जाणीव वाढली.अपरात्री हॉस्पिटलमध्ये एखादी डेथ झाली तर त्या पेशंट च्या नातेवाईकां सोबत नजीकच्या एरियातील पोलीस स्टेशन वर जाऊन मृत्यूची नोंद करणे. त्यासाठी लागणारी कागदपत्रं सोबत घेऊन जाणे.इत्यादी नाना प्रकारची कामं केली.केव्हा केव्हा खूप दमछाक होई. पण पापी पेट बळ देई.शिवाय हॉस्पिटल च्या मुख्य दारावर उभे असणारे गार्ड माझ्याशी अधून मधून गप्पा मारत.मला म्हणत एक जॉब आहे कराल का..?अमुक अमुक एरिया मध्ये वॉचमन ची नोकरी आहे.चांगला पगार मिळेल.नाईट ड्युटी असेल.इत्यादी सुचवत. हॉस्पिटल मध्ये काम करत असताना असे वेगवगळे अनुभव येत होते.परंतु इथे मला स्वतःचा इगो कुरवाळत बसायचा नव्हता. मी कोण आहे ,माझं मुख्य काम काय ..? इथे मला प्रत्येक जण कसं ट्रीट करतोय ह्या गोष्टींचा त्रास होऊ द्यायचा नव्हता.पण मला वाटतं ती फार कठीण गोष्ट आहे.कारण आपल्या भारतीय समाजात कामाचा दर्जा ठरवला जातो..अमुक काम करणं म्हणजे हलक्या दर्जाचं ,तमुक काम म्हणजे भारी दर्जाचं.आपण सगळेच भिकारचोट आहोत.
रात्री हॉस्पिटल मधून निघताना एक वाजत असे.घरी जाण्यास रिक्षा मिळत नसे मग पायी पायी जात असे.भटके कुत्रे वाजत गाजत मला घेऊन जात असतं.काही वेळेस काही रिक्षाचालकांनी घरी मोफत सोडलं.म्हणले पैसे नका देऊ.इतक्या रात्री तुम्ही एकटे दिसलात म्हणून सहकार्य केलं.हे पाहून मी हबकलो होतो. हीच माणुसकी भारताला वाचवू शकते.नाहीतर पै पै देखील न सोडणारे लोक आजूबाजूस आपण पाहतो.
ह्या कामा दरम्यान अनेक अनुभव आले. हॉस्पिटल मधल्या पेशंट शी बोलत राहणं,त्यांचं रडणं ऐकणं ,त्यांना सहानुभूती देणं ,त्यांच्या नातेवाईकांशी बोलत राहणं, मावशी, वॉर्डबोय चे नखरे, त्यांचे आपापसतले भांडण , तंटे ,घरच्या गरीब परिस्थिती मुळे कमी वयात कमावत्या झालेल्या , जास्तीच्या पैशाच्या अपेक्षेने डबल ड्युटी करणाऱ्या नर्सेस,पैशासाठी सकाळी वेगळ्या हॉस्पिटल मध्ये ड्युटी ,रात्री वेगळ्या हॉस्पिटल मध्ये ड्युटी करणारे वॉर्डबॉय ह्या सर्वांना पाहून तळागाळातील मनुष्य किती मेहनत घेत असतात ह्याची तीव्र जाणीव झाली. हॉस्पिटलमध्ये काही पेशंट चं हगणं,मुतणं वॉडबॉय ,मावश्याना काढावं लागत असे.त्यात काही काही पेशंट फारच वाईट अवस्थेत असतं.मग ते सगळे किस्से त्या मावश्या ,वॉर्डबॉय त्यांची कैफियत मांडत असतं. सर आम्ही पण माणसं आहोत हो..कधी कधी खूप वैताग येतो हो ह्या सगळ्याचा.आम्ही एकत्र जेवत असू तेव्हा ह्या साऱ्या गोष्टी कानी पडत.
हे सगळं ऐकून, पाहून त्याहून मी सुखी होतो. अशा माणसांना पाहिलं की स्वतःला जे आपण फाजील पणे गोंजारत असतो ते आपसूक कमी होतं.माझ्याबाबतीत ते झालं.मनात विचार आले की मी विशिष्ट वर्गात वावरत असतो.सभोवतालच्या लोकांचं आयुष्य बऱ्यापैकी गुडी गुडी असतं.शिवाय अश्या माणसांना तळागाळातील खडतर आयुष्य जगणाऱ्या माणसांशी काहीच देणं घेणं नसतं.त्यांना त्यांच्या कडे फक्त न फक्त तुच्छतेनं पाहता येतं.हे फार बोचतं.परंतु हल्ली समाजाची वाटचाल आमकेंद्री झालीय.त्यांना सभोवताल च्या परिस्थितीशी काही घेणं देणं नाही.त्यांना शिक्षण घेऊन बक्कळ पैसा कसा कमवावा ,परदेशात सेटल व्हावं इतकंच कळत असतं.भारतातले प्रश्न ही त्यांना माहीत नसतात.सभोवताली असे प्रचंड संख्येत लोक आहेत.हे सगळं भारत देशाला कुठे घेऊन जाणार हे ही कळत नाही.ह्यावर तोडगा आहे का हे ही कळत नाहीये.पण ही घुसमट माझी स्वतः शी होत असते.
अनेक पेशंट ना सांभाळणारे डॉ, पूर्ण हॉस्पिटल चं किती भार घेऊन वावरत असावेत हे तेच जाणो.हॉस्पिटल चालवणं हे वाटतं तितकं सोपं काम नव्हे ह्याची जबरी जाणीव झाली.
एकूण हा हॉस्पिटल चा अनुभव माझ्या आयुष्यातल्या अनुभवात मोलाची भर घालून गेला.

सुमन दाभोलकर.
.

]]>
https://sumandabholkar.prasand.in/2021/10/09/%e0%a4%b9%e0%a5%89%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%9f%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%80/feed/ 0 57
काका गेले https://sumandabholkar.prasand.in/2021/10/09/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%87/ https://sumandabholkar.prasand.in/2021/10/09/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%87/#respond Sat, 09 Oct 2021 08:01:03 +0000 https://sumandabholkar.prasand.in/?p=55 Continue reading काका गेले]]>

काका गेले.
(मनसे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर.)

आज सकाळी भावाचा फोन आला.म्हणाला अरे राजन काका गेले.तेव्हा मी शाळेच्या मुख्य गेटपाशी शाळेत नव्याने येणाऱ्या मुलांचं हसतमुखाने स्वागत करत होतो.आणि हे ऐकलं.साला हे आयुष्य जोकर करत कधी कधी.थोडा बाजूला झालो आणि शांत राहिलो.
राजन काका.आमच्या जवळचा माणूस. शिक्षण कमी होतं.परंतु अंगी असलेली नैसर्गिक हुशारी, मह्त्वाकांक्षी ,स्पष्टवक्तेपणा, स्वभावतः निडर, नेतृत्व क्षमता,दानी वृत्तीचा स्वभाव,अडीअडचणीत मदतीला धावून येणं, आदी गुणांच्या बळावर त्यांनी अगदी प्रतिकुलतेतून अनुकूलतेकडे वाटचाल केलेली.त्यांचं वय ५३ असावं.
अनेक ठिकाणी त्यांनी आंदोलनं केली होती.वेगवेगळे विषय घेऊन.अनेक वर्तमानपत्रात त्यांचं नेहमी काही न काही येत असे.त्यांचा मैत्र तर अनेक क्षेत्रातील लोकांशी होता.
हजरजबाबीपणा ,विनोदी स्वभाव ह्या गोष्टींमुळे त्यांचा सहवास हवाहवासा वाटे.आम्हा पुतण्या मंडळींची, लहान थोरांची ते फार मस्करी करत असत.बोलण्यात त्यांचा हात कुणी धरू शकत नसे.
मला नेहमी म्हणायचे, “आमची आदी ची परिस्थिती काय होती ता तुका माहिती आसा.. आमी खयसून खय इलो ह्या तुका चांगलाच माहिती आसा. काय काय कामा केली. “कोण वाट दाखयणारो नाय होतो.आमचे आमीच काय ते हातपाय मारून हयसर पोचलो.मला त्यांची कमालीची आवडती, शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांचा आत्मविश्वास.तो मला जबरी बळ देई.खूप काही शिकवत असे. शिवाय त्यांचं माणसांप्रती चं निरीक्षण तगडं होतं.
अप्रत्यक्षरीत्या मी त्यांच्यातल्या अनेक सकारात्मक गोष्टी घेतल्या.मी स्वभावतः बंडखोर आहे.
काकांची एक गोष्ट बारकाईने पाहिली होती ती म्हणजे ते अगदी सुरवातीपासून ‘मनसे’ ह्या राजकीय पक्षाशी बांधिलकी जपून होते.दोन वर्षांपूर्वी ते आमदारकी साठी निवडणुकीला मनसे तर्फे उभे राहिले होते.निवडून आले नाहीत पण खूप चांगली मत त्यांना मिळाली होती.ते म्हणायचे ,माझ्या राज साहेबांनी मला सिंधुदुर्ग जिल्ह्याचं अध्यक्षपद दिलंयं. आमदारकी साठी उभं केलं .त्यांच्यामुळे मी इथवर आलोय.नाहीतर मी मामुली माणूस होतो रे.
मी बऱ्याचदा वैतागायचो त्यांच्यावर.अहो साहेब साहेब करताय पण तुमची परिस्थिती आधी पहा.राजकारण करून आर्थिक सुबत्ता नाहीये अजून तुमची. बदला आता पक्ष.तुमचं घर चालवायला दुनिया येणार नाही.नाही हा पक्ष. तेव्हा बोलताना मी ते राज ठाकरे असा उच्चारायचो.तेव्हा ते मध्येच तोडून म्हणायचे ..अरे, साहेब म्हण साहेब. पण मी त्यांचं बिलकुल ऐकायचो नाही.
त्यांच्या काही गोष्टी मला बिलकुल पटायच्या नाहीत. पण माणूस म्हटल्यावर चांगले वाईट गुण आलेच. आपल्याला प्रत्येकाकडून जे योग्य वाटेल ते घेत राहावं.हा माझा फंडा आहे.मला योग्य वाटेल तेच मी ऐकायचो. नाहीतर सोडून द्यायचो. त्यावर ते मला नेहमी म्हणायचे , “अरे तूझो काका काय चीज आसा ना ता तुका माहिती नाय.माका कळता मी काय सांगतय ता तू ऐकनय नाय..पण एक लक्षात ठेय. मी तूझो काका आसय..काका.”
परंतु काकांची एक गोष्ट विशेष होती.त्यांनी इतक्या वर्षांत एकदाही मला पक्षात येण्याबद्दल,किंवा पक्षाच्या कोणत्या सभेला,कार्यक्रमाला ये म्हणून सांगितलं नाही.ते आमच्याशी नेहमी राजकारण विरहित असत. माझ्या आई वडिलांचा त्यांना विशेष आदर होता.मोठा भाऊ सरकारी नोकरीत अनुभवी माणूस होता ह्याचा त्यांना अभिमान वाटे.
ते नेहमी नीटनेटके राहत.कडक इस्त्रीचे कपडे,चांगल्या चपला, बूट ह्यांची त्यांना आवड.हा गुण माझ्यातही असल्याने आमचं ह्या बाबतीत जमायचं.मी काही कपडे घातले तर मला विचारायचे, खय घेतलय रे..? अमुक तमुक. गेल्यावर्षी बहिणीच्या लग्नात मी त्यांच्यासाठी चांगल्या प्रतीचा कुर्ता ,पायजमा, जॅकेट घेतलं होतं.आवडीने त्यांनी ते घातलं होतं.
मला एकदा ते तरुण भारत चे विजय शेट्टी ह्यांच्याकडे घेऊन गेले. म्हणाले तुझी ओळख करून देतो.फार चांगला माणूस आहे.तेव्हा त्यांच्या ऑफिसात गेल्यावर काका शेट्टींना म्हणाले ह्यो माझो पुतणो.चित्रकार आसा. लिखाण पण करता.तेव्हा शेट्टी सर म्हणाले, हो मला माहितीये ह्यांच्याबद्दल.मी वाचलंय ह्यांचं लिखाण फेसबुकवर.तेव्हा मला शेट्टींनी तरुण भारत साठी लिहिणार का विचारलं.मी तरुण भारत साठी वर्षभर ‘माय आय’ ह्या सदराखाली लिहिलं.त्यापूर्वी मी स्वांतसुखाय लिहीत असे.मात्र वर्तमानपत्रा साठी पहिल्यांदाच इतकं लिहिलं.
काका ना माझं नेहमी खूप कौतुक असे.बऱ्याचदा म्हणायचे.तू भारतात नाव करतलय दाभोलकरांचा.ह्या लिहून ठेय.माका शंभर टक्के खात्री आसा.त्यावर मी त्यांना म्हणायचो काका, राजकारणी भाषा लोकांकडे वापरा. माझ्यासमोर नको.अरे मस्करी नाय रे.माझे हे शब्द तू लक्षात ठेय.मी त्यांना गमतीने आमदार म्हणायचो. त्यांना म्हणायचो तुम्ही देशपातळीवरील नेते व्हाल.ते ऐकून मला ते म्हणायचे, अरे वा माझी शाळा माकाच.?
मुंबईत काही कामानिमित्त आले की माझ्याघरी असायचे.दिवसभर बाहेर असायचे.रात्री घरी येताना फोन करायचे जेवायला काही आणु का वगैरे..? पैसे खर्च करायला कधी आखडता हात नाही घ्यायचे.गावी गणपतीला आम्ही सगळे एकत्र जमलो की सर्वांसाठी खाऊ,नाश्ता नेहमी मागवायचे.लोकांना खाऊ घालण्यात त्यांना कमालीचा रस होता.
वर्षभरापूर्वी काकांना कॅन्सर ने गाठलं. वेळेवर जे योग्य उपचार करायला हवे होते ते न करता नको ते उपचार घेत राहिले.त्यात कॅन्सर ची पातळी वाढत गेली.अनेक महिने हॉस्पिटल मध्ये उपचार घेतल्यावर घरी परतले.तेव्हा त्यांना पाहायला मी गेलो होतो.त्यांची ती अवस्था.पाहून जोरदार चटका लागला.डोळे डबडबले.
त्या अवस्थेत ते म्हणत “माझा काय खरा नाय रे…पाच सहा महिने धड काढलंय तर पुढे जगान.”
चार दिवसांपूर्वी काकीचा दुपारी मला अचानक फोन आला की त्या टाटा हॉस्पिटल मध्ये गेल्या होत्या काकांना घेऊन.कणकवलीत जिजी उपरकरांनी मदत केली.त्यांनीच मुंबईला पाठवायची सोय केली. मुंबईत दादर स्टेशनवर विश्रामगृहात आहेत. रात्रीच्या रेल्वेने कणकवलीला निघणारेत. मी म्हटलं येतो मी. तिकडे पोचलो काका ,काकी बसले होते.काकांची अवस्था वाईट होती.हाफ पॅन्ट ,शर्ट. सभोवताली हाताने इशारे करत होते.ह्या अवस्थेत ते केव्हा घरी पण राहिले नसतील.
काकी म्हणाल्या ह्यांना धड उभं राहता येत नाहीये.
ते जे बोलताहेत ते कळत नाहीये. माझ्याकडे एवढ्या सगळ्या बॅगा आहेत. त्यांच्याकडे चार पाच बॅगा होत्या. उपचारादरम्यान मुंबईत राहावं लागेल ह्या अंदाजाने त्या सामान घेऊन आल्या होत्या.ह्यांना सांभाळता सांभाळता नाकी नऊ आले रे माझ्या.बराच वेळ झाला होता. मी सगळं ऐकत होतो.काय बोलावं काय करावं काहीच सुचत नव्हतं.आयुष्य किती भिकारचोट अनुभव देतं…? ते कोरडे नाही ना करणार..?
रेल्वे येण्यास काही वेळ असताना तिकडे मनसे ची दोन माणसं पोचली होती.त्यातल्या एकाने काकांना व्हील चेअर वरून गाडी ज्या ठिकाणी होती तिकडे नेलं.प्लॅटफॉर्म बदलावे लागले.मी काकीच्या हातातल्या काही बॅगा घेतल्या.मनसेच्या माणसांनी काकांना रेल्वेच्या डब्यात सीट वर त्यांना झोपवलं.त्यातला एकजण त्यांचा गुपचूप व्हिडिओ घेत होता. कदाचित त्याच्या सेवेचा तो पुरावा ठेवत असावा.हे सगळं मी पाहत होतो. कणकवलीला पोचल्यावर देखील मदतीला फारसं कुणी नव्हतं. त्यांचं घर चौथ्या मजल्यावर.त्यात बिल्डिंग ला लिफ्ट नाही.त्यांचा मुलगा, मुलगी आणि शेजारचा एक जण.रेल्वेतून उतरून घरी जाईपर्यंत वाट लागली.काकी नी संध्याकाळी मला फोनवर सांगितलं.
मला वाटलेलं काकांनी जी त्यांच्या आयुष्यात माणसं जोडली आहेत ती अश्या वाईट काळात ओसंडून वाहतील.स्टेशन वर त्यांच्या साथिंची गर्दी असेल.पण असं काहीच नव्हतं. दादर स्टेशन आणि कणकवली स्टेशन त्यांच्यासाठी सूनं होतं. आयुष्यात कुणी कुणाचं नसतं. स्वतःला मानसिक ,आर्थिक ,शारीरिक रित्या प्रचंड मजुबत करायलाच हवं. कुणावरही विसंबून राहिलो तर संपलो.आपण भारतीय नेहमी तोंड वर करून संस्कार संस्कार बोंबलत असतो मात्र बहुतांश समाजात ते कुठेच दिसत नाहीत.आपण कमालीचे दांभिक आहोत.
शेवटी जीवनाचा सार काय तर….कोण नाय कोणचा डाळ भात लोणचा,.

सुमन दाभोलकर.

]]>
https://sumandabholkar.prasand.in/2021/10/09/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%87/feed/ 0 55
Untitled https://sumandabholkar.prasand.in/2021/10/08/hello-world/ https://sumandabholkar.prasand.in/2021/10/08/hello-world/#comments Fri, 08 Oct 2021 13:34:35 +0000 https://sumandabholkar.prasand.in/?p=1

या

]]>
https://sumandabholkar.prasand.in/2021/10/08/hello-world/feed/ 1 1